लहानपणापासून कुणाल मराठे यांना देशभक्ती व सामाजिक कार्याची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर सिव्हिल क्षेत्रात कंत्राटदार म्हणून काम करण्यास सुरूवात केली. वार्डातील सामाजिक प्रश्न सोडवणे, वर्गणी, भंडारा या माध्यमातून लोकांशी संपर्क वाढला. कॉलनीतील रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी तीन दिवस महानगर पालिका कार्यालय समोर आमरण उपोषणसुध्दा केले. एवढेच नाहीतर रक्तदान शिबिरे, अन्नदान, कोरोनाच्या काळात किराणा कीट वाटप, टुर्नाेमेंट, अनाथलयात व घाटीत फळ वाटप, वार्डातील महिलांना संरक्षणाचे प्रशिक्षण तसेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलने केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते महोत्सव, गरजवंत मुलांना रेनकोट, दप्तर, मोलकरणी, भाजी विक्रेत्यांना छत्र्याचे वाटप, आरोग्य तपासणी शिबिर घेतले.